breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृत्रिम हौदाऐवजी शाडूच्या लहान गणेशमूर्ती बनविण्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे 

  • पराग गोखले यांचे प्रतिपादन

पिंपरी – हिंदू धर्मात सांगितलेले सर्व सणउत्सव हे निसर्गाशी अनुकूलच आहेत. मात्र, ३६४ दिवस झोपलेले पर्यावरणवादी व नास्तिक गणेशोत्सवाच्या वेळी जागे होऊन केवळ हिंदूंच्या उत्सवांना लक्ष करतात. यामागे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांच्या अभ्यासहीन प्रचाराला बळी पडून सरकारने कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन दिले. मात्र, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याने त्याचा वापर न करण्याचा निकाल हरित न्यायाधीकरणाने २०१६ मध्ये दिला. तरीही, शासनाच्या निष्क्रीयतेमुळे अशा मूर्ती बनवून त्याची विक्री चालू आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पुणे समन्वयक पराग गोखले यांनी केले.

 

गोखले म्हणाले की, कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती कचरा उचलण्याच्या डंपरमधून पुन्हा नदीत फेकून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी झालेला वायफळ खर्च शासनाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून वसूल केला पाहिजे. कृत्रिम हौदाऐवजी शाडूच्या लहान गणेश मूर्ती बनविण्याच्या विधायक कार्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच उत्सवाचे पावित्र्य टिकेल, यासाठी गणेशमंडळांनी पुढाकार घ्यावा. कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन असो, अथवा अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात असो, त्याने गणेशाची विटंबनाच होत आहे. दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात घुसलेल्या धर्मशास्त्राच्या विरोधी संकल्पना प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच प्रसारित केल्या जात आहेत. त्याला सनदशीर मार्गाने विरोध करण्याच्या जोडीला गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून तो आदर्शरित्या साजरे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

या शिबीरात मोहनराव डोंगरे, नीलेश निढाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले, शिवाजी रस्ता येथील वस्तादशेठ मंडळाचे अमरनाथ हिंगमिरे, भवानी पेठ येथील आदर्श बाल मंडळाचे अमोल नाचण, श्रद्धानगर मित्रमंडळाचे सचिन गुंड, गुरुवार पेठ येथील वीर तानाजी युवक मंडळाचे संजय रजपूत, अलका चौक येथील समाज विकास मंडळाचे नीलेश वैराट यांच्यासह अन्य मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिबीरस्थळी सनातनच्या सद्गुरु कु. स्वाती खाडये यांचीही उपस्थिती लाभली.

 

आदर्श गणेशोत्सवाचा मंडळांनी केला निर्धार

या शिबिरात ‘गणेशोत्सवात काय असावे ? काय नसावे ?’ या विषयावर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी उपस्थित उत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपल्या मंडळांच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याविषयी आपले अनुभव कथन केले आणि सार्वजनिक उत्सव आदर्शरीत्या साजरे करण्याचा गणेशोत्सव मंडळांनी निर्धार व्यक्त केला. शिबीराच्या अंतिम सत्रात हिंदु जनजागृती समितीचे मिलींद धर्माधिकारी यांनी ‘हिंदु राष्ट्र का हवे’ या विषयी उपस्थितांना अवगत करून दिले. सर्वांनी एकत्रितरित्या वन्दे मातरम् म्हणून या शिबीराचा शेवट झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button