breaking-newsराष्ट्रिय

#Jayshreeram:राम मंदिर भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

लखनऊ : अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करत आहेत.

नरेंद्र मोदी सकाळी साडेअकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. आधी त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे विधी पार पडले.

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता. भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांच्या 135 साधू-संतांचे आशीर्वाद लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button