breaking-newsराष्ट्रिय
सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. २०१९ साली त्यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येबाबतीत निर्णय सुनावण्यात आला होता. आज याच मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.त्यामुळे सध्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तिंनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे