breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘महायुती सरकारचा अर्थसंकल्प सबळ आणि सशक्त महाराष्ट्र घडवणारा’; इरफान सय्यद

सशक्त महाराष्ट्र घडवणाऱ्या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करतो

पिंपरी : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला. सर्व घटकांना, सर्वसामान्यांना, महिला वर्गाला, शेतकरी, वृद्धांना, दिव्यांगांना सर्वसमावेशक असा हा सर्वतोपरी विकासबाबींना लक्षात घेऊन ‘न भूतो न भविष्यतो’ अशा या शिवशाही अर्थसंकल्पाचे राज्यभर जनेतेकडून स्वागत होत आहे. त्यामुळे विरोधकांची तोंडं बंद झाली आहेत, अशी टीका शिवसेनेचे उपनेते तथा राज्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी विरोधकांवर केली आहे.

इरफान सयद यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने शाहूनगर येथे अर्थसंकल्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी इरफानभाई बोलत होते. यावेळी फटाके फोडून व पेढे वाटून शिंदे व फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

इरफान सय्यद पुढे बोलताना म्हणाले, आर्थिक खाचखळग्यांवर सत्तेची रिक्षा कोलमडण्याची उत्कंठेने वाट पाहणार्‍यांची तोंडे या यशस्वी अर्थसंकल्पामुळे कडवट होणे साहजिक आहे. कर्जमुक्तीची भरमसाठ आश्वासने देऊन सरकारने शेतकर्‍यांना फसवल्याचा कांगावा विरोधी पक्षनेते सतत करीत आहेत, पण अर्थसंकल्पात वास्तवाचे भान राखण्याची खबरदारी महाराष्ट्राचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात घेतली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, महीला, युवक युवती, कामगार, शिक्षण सेवक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, उद्योगक्षेत्र व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी प्रचंड भरीव तरतूद केल्याबद्दल हा अर्थसंकल्प सबळ आणि सशक्त महाराष्ट्र घडवणारा आहे, या अर्थसंकल्पाचे आम्ही जल्लोषात स्वागत करतो. कामगार वर्गाच्या वतीने युती सरकारचे आम्ही आभार मानतो.

यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, रवी गोडेकर, प्रमोद शेलार, खंडू गवळी, पांडुरंग कालोखे, भिवाजी वाटेकर, मारुती कौदरे, सतीश कंठाळे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, अशोक साबळे, गोरक्ष दुबाले, सुनिल सावळे, चंद्रकांत पिंगट, अविनाश जांभळे, अमृत शिंदे, बालाजी खैरे, अक्षय कदम, संदीप जाभले, न्यानेश्वर घनवट, विश्वजीत कदम, नागेश व्हनवटे, बबन काळे, समर्थ नाईकवडे, श्रीकांत सुतार, सोमा फुगे, अमित पासलकर, चंदन वाघमारे, रतनाकर भोजमे, शेकडो संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button