breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; १० नोव्हेंबरला लागणार निकाल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील अशी माहिती देण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी
करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. “सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख पेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्हज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था कऱण्यात आली,” असल्याची माहिती सुनील अरोरा यांनी दिली.

करोना रुग्णांसाठी स्वंतत्र सोय

https://twitter.com/ANI/status/1309392588147843072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1309392588147843072%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmahaenews.com%2Fwp-admin%2Fpost-new.php


करोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button