breaking-newsपिंपरी / चिंचवड

रात्र निवारा केंद्रातील लोकांना स्वच्छता विषयावर मार्गदर्शन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आज दिनांक ३० एप्रिल २०२० रोजी दुपारी १ वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका रात्र निवारा केंद्र पिंपरी भाजी मंडई येथे वास्तव्य करीत असलेल्या एकूण २० लोकांकरिता आज समुह संघटिका किर्ती वानखडे यांच्या द्वारे स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले चर्चा करण्यात आली.

कोरोना हा आजार कसा होतो तो टाळण्याकरिता कुठली स्वच्छता बाळगू शकतो या संदर्भात या लोकांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर महिलांच्या वैयक्तिक स्वच्छते बद्दल देखील त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. बाहेर असलेल्या लोकांपेक्षा आपली परिस्थिती किती बरी आहे. आपण किती सुरक्षित आहोत, याचे महत्त्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. शारीरिक व मानसिकदृष्ट्या आनंदी राहता यावे म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देखील घेण्यात आली.

या वेळी समुह संघटक नागेश मापारी व दत्तात्रय गोईकर यांचा देखील सहभाग होता. येथे वास्तव्य करीत असलेल्या सर्व लोकांचा या ऍक्टिव्हिटी मध्ये खूप चांगला सहभाग दिसून आला. समाज विकास अधिकारी नागरवस्ती विकास योजना विभाग, श्री. संभाजी ऐवले यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम रात्र निवारा केंद्र पिंपरी भाजी मंडई येथे संपन्न झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button