breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ वर

  • मुंबईत १,१३२, पुण्यात २,७२४ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १३ हजार १६५ नवे रुग्ण आढळले, तर ३४६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ४ लाख ४६ हजार ८८१ वर पोहोचली आहे. तर राज्याची एकूण रुग्णसंख्या ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा २१ हजार ३३ वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १ लाख ६० हजार ४१३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे १ हजार १३२ नवे रुग्ण आढळले, तर ४६ जणांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३१ हजार ५४२ वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात ८६४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख ६ हजार ५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी २ हजार ७२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार २२१ जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार २९३ इतकी झाली आहे. त्याचबरोबर बुधवारी जिल्ह्यात तब्बल ९० रुग्णांचा मृत्यू झाला. यासह येथील कोरोनाबळींचा आकडा ३ हजार २९० वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात १ हजार ५८८ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १ लाख ७१२ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button