breaking-newsमुंबई

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं निधन

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा यांच्या निधनाने कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर ही तीन मुलं तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली असा परिवार आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर, अभिनेत्री रविना टंडन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कृष्णा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.

View image on TwitterView image on Twitter

Anupam Kher

@AnupamPKher

Deeply saddened to learn about the sad demise of Smt. . She was one of the most dignified and affectionate ladies that I met. May her soul rest in peace. My condolences to the entire Kapoor and Nanda family. Om Shanti.🙏

Raveena Tandon

@TandonRaveena

.🕉🙏🏻🕉 Condolences to the entire Kapoor family. An era passes away, .God give you strength,and may the soul rest in peace. Om Shanti. @chintskap

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button