breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून दररोज 8 हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब आहे .

राज्यात शनिवारी (18 जुलै) दिवसभरात 8 हजार 348 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 937 वर पोहोचला आहे. त्याआधी म्हणजे 17 जुलै रोजी 8 हजार 308 नवे रुग्ण आढळले होते. तर 16 जुलै रोजी राज्यात सर्वाधिक 8 हजार 614 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

राज्यात शनिवारी दिवसभरात 5 हजार 306 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 23 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.50 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button