breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटतेय – आरोग्यमंत्री

मुंबई | महाराष्ट्रात आज दिवसभरात करोनाचे २३२ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या आता २ हजार ९१६ इतकी झाली आहे. यापैकी २९५ रुग्ण पूर्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, बुधवारी राज्यात साडेतीनशे रुग्ण आढळले होते. त्यात आज शंभरपेक्षाही अधिक घट झाली आहे.करोनाची लागण होऊन राज्यात आतापर्यंत १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईत दोन, पुण्यात सहा, अकोल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सहा पुरुष व तीन महिलांचा त्यात समावेश आहे. या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण ६० वर्षावरील होते, तीन रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होते तर दोन रुग्ण ४० वर्षांखालील होते. ९ पैकी ६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयरोग असे आजार आधीपासून होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button