breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अकराव्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

पुणे : इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवित असताना अकराव्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली.

ओम अतकरी, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कात्रज- कोंढवा रस्त्यावरील हामी पार्क या सोसायटीत अतकरी कुटुंब राहते. ओम हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीमध्ये शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम आणि त्याचा मोठा भाऊ आदित्य (वय १४) हे दोघे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवित होते.

या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गच्चीवर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांसाठी अद्याप संरक्षक भिंत बांधलेली नाही.

घरात काहीतरी काम असल्याने ओमचा मोठा भाऊ त्याला वरच सोडून खाली निघून आला. पतंग उडविण्यात दंग असलेला ओम पाठीमागे चालत गेला. डक्टसाठी सोडलेल्या जागेत कठडा नसल्याने तो थेट अकराव्या मजल्यातून डक्टमध्ये पडला.

ओम खाली पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ओमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button