breaking-newsमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ वर

मुंबई – महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात ७ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०० कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ वर पोहोचली असून एकूण कोरोनाबळींचा आकडा १६ हजार १४२ इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात काल आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल दिवसभरात १२ हजार ३२६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७०९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख १८ हजार १३० इतकी झाली असून यापैकी ९० हजार ९६२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ६ हजार ५४९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २ हजार ९८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १९२ जणांचा समावेश आहे. तसेच काल पुण्यात ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९४ हजार ९७८ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २ हजार १८५ इतका झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button