breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्य

खुशखबर! जानेवारीपर्यंत कोरोना लसीला मंजुरी मिळू शकते, AIIMS ची माहिती

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सुखद बातमी आहे. वर्षाच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरूवातीला कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते. दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली.

सध्या भारतात 6 लसींवर काम सुरू आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. ब्रिटनने लसीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या फायझरला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. तिसरा टप्प्यातील चाचणी घेत असलेल्या लसींपैकी कोणत्याही एका लसीला मंजुरी मिळू शकते. या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही लसीची उत्पादन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती डॉक्टर गुलेरिया यांनी दिली आहे.

अवश्य वाचाः नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची शक्यता

दरम्यान, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस कोव्हशिल्डची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आंतरराष्ट्रीय स्तरावर समोर आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कंपनी लवकरच आपत्कालीन मंजुरीची तयारी करत आहे.

दुसरीकडे, युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही रशियन अधिकाऱ्यांना ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button