breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,86,807 वर

  • मुंबईत 521, पुण्यात 501 नवे रुग्ण

मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 3,442 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,86,807 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,395 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 70 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,66,010 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,339 वर पोहोचला आहे. तर सध्या 71,356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 521 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,85,580 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,995 इतका झाला आहे. तसेच काल 403 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,64,851 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,812 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 501 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3.63 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 3.38 लाख लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या 16,781 जणांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button