breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

चंद्रपुरात ट्रॅक्टर-कारची भीषण धडक;चौघा मित्रांचा मृत्यू

चंद्रपूर – चंद्रपुरात ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण धडकेत चौघा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात काल रात्री हा अपघात झाला. बर्थडे पार्टीवरून घरी येताना चंद्रपुरात कारला भीषण अपघात झाला. या अपघातातून वाढदिवस असलेला मित्र वाचला, मात्र आपल्या चार मित्रांचे मृत्यू त्याने पाहिले. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील आहेत. दरम्यान, घरातील तरुण मुलांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,86,807 वर

मिळालेल्या माहितीनुसार, योग गोगरी या तरुणाचा 23 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र हॉटेलमध्ये गेले होते. चंद्रपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण घरी येण्यासाठी निघाले. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागातून जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला आणि वेगात असलेली गाडी अचानक ट्रॅक्टरवर धडकल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) या चौघांना प्राण गमवावे लागले. तर बर्थडे बॉय योग गोगरी (23) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button