breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाखांच्या पार

  • मुंबईत 1,147, पुण्यात 966 नवे रुग्ण

मुंबई – गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 6,406 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,02,365 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,815 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 65 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,68,538 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 46,813 वर पोहोचला आहे. तर सध्या 85,963 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 1,147 नवे रुग्ण आढळले, तर 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,79,737 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,739 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 548 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह मुंबईत आतापर्यंत 2,54,152 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 966 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,39,562 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,353 इतका झाला आहे. तसेच काल 725 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,20,418 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 10,328 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 966 रुग्णांमध्ये 430 रुग्ण पुण्यातील असून 231 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड येथील आहेत. तसेच 230 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button