breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महिलांना लहान मुलांसोबत लोकल प्रवास करता येणार नाही

मुंबई – अनलॉक अंतर्गत राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी महिलांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र महिला लोकलमधून आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आता महिलांसोबत लहान मुलांना लोकल प्रवासाची परवानगी नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून खडसाविण्यात आले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्याने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. मग 17 ऑक्टोबरपासून महिलांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली. सर्व महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येत आहे. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही आहे.

यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात असेल. हा जवान महिलांची तपासणी करेल. महिलेसोबत लहान मुल आढळल्यास तिला रेल्वे स्थानकातून माघारी पाठविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button