breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

पुणे | शरद महोळ याचा ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना २४ तासांत अटक केली होती. त्यानंतर तपासादरम्यान १५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला अटक झाली आहे.

याप्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली होती. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींनी आम्ही गणेश मारणे टोळीतील आहोत, असा आरडाओरडा केला होता. मारणे याने खून प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मारणे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले.

हेही वाचा   –    मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार

गणेश मारणे पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी मारणेसह तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गु्न्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button