breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे

  • मुंबईत २,२०९, पुण्यात ३,६६७ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात २० हजार ५९८ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ८ हजार ६४२ वर पोहोचला आहे. तसेच राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा आणि टक्काही वाढत चालला आहे. काल दिवसभरात तब्बल २६ हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७३.१७ टक्के झाले आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यूचा आकडा कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. काल राज्यात आणखी ४५५ मृत्यूंची नोंद झाली. यासह राज्यातील कोरोनाबळींचा एकूण आकडा ३२ हजार ६७१ इतका झाला असून मृत्यूदर सध्या २.७ टक्के इतका आहे. तसेच राज्यात सध्या २ लाख ९१ हजार २३८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रविवारी २ हजार २०९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ८४ हजार ४३९ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ४६९ इतका झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांनी रविवारी रात्री नऊ वाजता अडीच लाखांचा आकडा पार केला. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार ६६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार ७०० रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ५२ हजार १६८ वर गेली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात काल ६९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३ हजार १६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यासह जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ५ हजार ६९८ इतकी झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २ लाख ३ हजार ५०७ वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button