breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर

  • मुंबईत १,५८५, पुण्यात ३,८८९ नवे कोरोना रुग्ण

मुंबई – जगभरात शेकडो देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका, दुसऱ्या स्थानावर भारत आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलनंतर रशियाचा चौथा क्रमांक आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे एकट्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी रशियालाही मागे टाकले. रशियाची एकूण रुग्ण संख्या सोमवारी १० लाख ७३ हजार ८४९ इतकी होती. तर महाराष्ट्राची रुग्ण संख्या सोमवारी १० लाख ७७ हजार ३७४ इतकी झाली. त्यात मंगळवारी आणखी २० हजार ४८२ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात ५१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा आता ३० हजार ४०९ इतका झाला आहे. तर सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी १ हजार ५८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ४९ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्ण संख्या १ लाख ७३ हजार ५३४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार २२७ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ३० हजार ८७९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ८८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३१ हजार १९६ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ७० कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने येथील कोरोनाबळींची संख्या ५ हजार २९२ इतकी झाली आहे. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६९१ जणांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे शहराची रुग्ण संख्या आता १ लाख २२ हजार ४४८ इतकी झाली आहे. तर ९९७ नव्या रुग्णांसह पिंपरी-चिंचवडची रुग्ण संख्या ६५ हजार ३७९ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर ग्रामीण पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ हजार ३६९ इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button