breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

रामलल्लाच्या मूर्तीचा तो फोटो खरा नाही; मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले..

Ram Mandir Ayodhya | अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील रामलल्लाचा व्हायरल झालेला फोटो हा राम मंदिराच्या गाभाऱ्यातील नाही. गाभाऱ्यातील मूर्ती अद्याप झाकून ठेवलेली आहे, असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याशिवाय प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे उघडले जात नाहीत. ते झाकलेलेच असतात. सध्या ज्या मूर्तीचा फोटो व्हायरल होत आहे, ती खरी मूर्ती नाही. जर डोळे दिसणारा फोटो व्हायरल झाला असेल तर तो कुणी केला? याची चौकशी आम्ही करू.

हेही वाचा    –    खासदार श्रीरंग बारणे यांची मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहीम

रामलल्लाची पूर्ण मूर्ती सध्या झाकून ठेवलेली आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्याआधी मूर्तीचा श्रृंगार करण्यात येईल, धर्मातील कर्मकांडाप्रमाणे विधीवत श्रृंगार पार पडेल. मात्र डोळे सोहळ्यानंतरच दाखविण्यात येतात, असंही आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.

शुक्रवारी सोशल मीडियावर रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला. ५१ इंचाची काळ्या दगडातील मूर्तीचा फोटो व्हायरल झाला होता. पाच वर्षांच्या रामलल्लाची ही मूर्ती असल्याचे बोलले गेले. मूर्तीच्या हातात धनुष्य-बाणही दिसत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button