breaking-newsमनोरंजन

जेईई पास झालेल्या “त्या’ विद्यार्थ्यांना ऋतिक रोशनकडून पार्टी

बॉलीवूडमधील अभिनेता ऋतिक रोशन त्याच्या आगामी “सुपर-30′ या बायॉपिक चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याचे शुटिंग पाटणा येथे सुरू असून हा चित्रपट प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्यावर आधारित आहे. आनंद कुमार हे पाटणा येथे दरवर्षी अशा 30 विद्यार्थ्यांकडून जेईई परिक्षेची तयारी करून घेतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ते महागड्या क्‍लासेसमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. या बॅचला त्यांनी “सुपर-30′ असे नाव दिले आहे. यावरच दिग्दर्शक विकास बहल बायॉपिक चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

यावर्षी “सुपर-30’पैकी 26 विद्यार्थ्यांचे आयआयटी जेईईला सिलेक्‍शन झाले आहे. या विद्यार्थ्यांना ऋतिक रोशन शनिवार, दि. 23 जून रोजी एक जबरदस्त पार्टी देणार आहे. याबाबत ऋतिकने सांगितले की, “सुपर-30’मध्ये भूमिका साकारताना मला समजले की ही परिक्षा पास होणे किती कठीण असते. या पार्टीच्या निमित्ताने मी त्यांना भेटू शुभेच्छा देऊ इच्छित आहे. दरम्यान, आनंद कुमार यांनी 2002 पासून “सुपर-30′ बॅच सुरू केली आहे. या चित्रपटाच्या सेटवरून आतापर्यंत ऋतिक रोशनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तसेच हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button