breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे

  • मुंबईत १,९१०, पुणे शहरात २,०९३ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात शनिवारी तब्बल २० हजार ४८९ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले होते. हा विक्रमी आकडा रविवारी मागे पडला. रविवारी दिवसभरात राज्यात तब्बल २३ हजार ३५० नवे रुग्ण आढळले. तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २६ हजार ६०४ इतका झाला आहे. दरम्यान, रविवारी एका दिवसात राज्यात ७ हजार ८२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह राज्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ६ लाख ४४ हजार ४४० इतकी झाली असून सध्या २ लाख ३५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रविवारी १ हजार ९१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३७ रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ६२२ वर पोहोचली आहे. यापैकी ७ हजार ८६६ रुग्णांनी आपला जीव गमावला असून १ लाख २३ हजार ४९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २३ हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. पुणे शहरात रविवारी दिवसभरात २ हजार ९३ नवे कोरोनाबाधित आढळल्याने येथील एकूण रुग्ण संख्या १ लाख ५ हजार ९०५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात आतापर्यंत २ हजार ५१२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ५६९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना काल घरी सोडण्यात आले. त्यामुळे शहरात आतापर्यंत ८६ हजार ९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात १ हजार ४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ९१३ जणांना डिस्चार्ज मिळाला. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजार २३४ वर पोहोचली आहे. यापैकी ४३ हजार ९८२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ६ हजार २२६ रुग्ण उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button