breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ८३ हजार ८६२वर

  • मुंबईत १,७३५, पुण्यात ४,०५० नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचे प्रमाण सतत वाढत आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली. शनिवारी राज्यात उच्चांकी 20 हजार 489 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 312 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी राज्यात 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी 19 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले होते. यासह राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 8 लाख 83 हजार 862 वर पोहोचला आहे. तसेच काल दिवसभरात 10 हजार 801 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 6 लाख 36 हजार 574 इतकी झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 26 हजार 276 जण कोरोनामुळे दगावले असून सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत शनिवारी दिवसभरात 1 हजार 735 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर 33 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 53 हजार 712 वर पोहोचला असून कोरोनाबळींची संख्या 7 हजार 829 इतकी झाली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८० टक्क्यांवर आले आहे.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातून दररोज धडकी भरविणारी नव्या रुग्णांची संख्या समोर येत आहे. शनिवारी दिवसभरात पुण्यात ४ हजार ५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ८७ हजार १९३ वर पोहोचली असून कोरोनाबळींची संख्या ४ हजार ४९५ इतकी झाली आहे. तसेच काल दिवसभरात २ हजार २७६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button