breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20,60,186 वर

मुंबईत 529, पुण्यात 612 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काल, शनिवारी आढळलेल्या 3,611 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,60,186 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 1,773 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 38 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 19,74,248 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 51,489 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यात 33,269 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळले, तर 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,13,431 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,413 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 542 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने सध्या 5,276 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 612 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,92,200 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9,138 इतका झाला आहे. तसेच काल 450 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,78,590 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 612 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 331, पिंपरी-चिंचवडमधील 120, ग्रामीण भागातील 120 आणि कंटेनमेंट झोनमधील 40 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button