breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

टूलकिट प्रकरणी बंगळुरुतील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी अटकेत

नवी दिल्ली – पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुतील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ मोहिमेची संस्थापक सदस्य आहे.

टूलकिट समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणात दिशा रवी या तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात ती वास्तव्याला असून तिथेच पोलिसांनी तिला अटक केले. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टूलकिटच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचला जातोय, भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे, असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यात ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही पण तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्पष्ट केले आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीनंतर दिल्लीत हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानाबरोबर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली. त्यानंतर टूलकिट प्रकरण समोर आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button