breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विधान परिषद ‘दंगल’ : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटीलांचे ‘वेट ॲड वॉच’, शिफारसींसह ‘दादां’समोर ठेवला प्रस्ताव पण…! (वाचा)

विधान भवनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा

योगेश बहल यांच्यानंतर वाघेरे-पाटलांकडूनही समर्थकांचे  ‘शिफारस अस्त्र’

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून विधान परिषदेवर संधी मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तब्ब्ल ३५ वर्षे ‘पवार’ कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेल्याचा फायदा आता होईल, असा विश्वास वाघेरे-पाटलांना आहे.

शुक्रवारी विधान भवन, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोजक्या साथीदारांसह वाघेरे-पाटील यांनी भेट घेतली. या छोटेखानी बैठकीत समर्थकांची शिफारस केलेले निवेदनही देण्यात आले आहे.  यावेळी श्री. वाघेरे-पाटील यांच्यासोबत प्रवक्ते फझल शेख महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक आघाडीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांच्यासह विजय लोखंडे, प्रदीप गायकवाड, प्रकाश सोमवंशी, सूर्यकांत पात्रे आदी उपस्थित होते.

दरम्यान, महापालिकेतील पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह काही आजी-माजी नगरसेवकांचे वाघरे-पाटलांच्या आमदारकीसाठी समर्थन असल्याचे म्हटले आहे.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मला तुमची मागणी समजली आहे. त्याबाबत आता तुम्ही मोठ्या साहेबांना भेटा. त्यांच्यासोबत चर्चा करुनच मग, काय तो निर्णय होणार आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही तुम्ही मागणी करा…’ अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता वाघेरे-पाटील यांनी आपला मोर्चा मोठे साहेब अर्थात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्षांकडे वळवला आहे. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. याबाबत  वाघेरे-पाटील आता ‘वेट ॲड वॉच’ च्या भूमिकेत आहेत.

…यासाठी द्यायला हवी वाघेरे- पाटलांना संधी?

गेल्या ३५ वर्षांपासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना होण्याअगोदरपासून वाघेरे-पाटील कुटुंबीय शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ  आहेत. महापौर, नगरसेवक असा कामाचा अनुभव आहे.  गेली पाच वर्षे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. अनेक दिग्गज पक्ष सोडून गेले. काहींनी पक्षात राहून विरोधात काम केले. पण, वाघेरे-पाटील महापालिका निवडणूक (2017) जिद्दीने लढले. त्यांच्या  नेतृत्त्वाखालीच पक्षाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या वाघेरे-पाटलांनी पक्षाच्या पडत्या काळात मदत केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मावळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतानाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. शहरात सध्या अन्य नेते इच्छुक आहेत. पण, त्यांना पक्षाने अनेक महत्त्वाची पदे दिली आहेत. आता वाघेरे-पाटलांना संधी द्यावी, असा आग्रह वाघेरे-पाटील समर्थकांचा आहे.  

राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी निकाषांबाबतची पुर्तता ही अशी…

सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात  उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींमधून राज्यपाल नियुक्त १२ जागांवर विधान परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, असा साधारण निकष आहे. वाघेरे-पाटीलही निकषांची पुर्तता करण्याची तयारी ठेवली आहे. पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या समितीवर वाघेरे-पाटील सदस्य आहेत. मी स्वत: उत्तम खेळाडू आहे. कबड्‍डी असोसिएशनच्या जिल्हा समितीवर कार्यरत आहे. तसेच, किक बॉक्सिंगच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची धुराही सांभाळत आहे, पक्षाच्या पडत्या काळात मी काम केले आहे. आता मला संधी मिळाली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे, अशी प्रतिक्रीया श्री. वाघरे-पाटील यांनी ‘महाईन्यूज’ शी बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button