breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजर्षि शाहू महाराज उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेचा होणार सदुपयोग

  • अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार जागेचा विकास करावा
  • नगरसेविका अनुराधा गोरखे यांची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रतील प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षि शाहू महाराज उड्डाण पुलाखाली मोकळी जागा आहे. या जागेचा लोकोपयोगी कार्यासाठी वापर व्हावा. याकरिता या जागेचा अर्बन स्ट्रीट डिझाईनअंतर्गंत विकास करावा आणि तेथे नागरिकांसाठी उद्यान, जॉगिंग ट्रक, बसण्यासाठी लॉन, बेंचेस आणि खुली व्यायामशाळा अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

या मागणी संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर देखील सकारात्मक असून लवकरच कार्यवाही सुरू करणार आहेत. या संदर्भात गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रतील प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षि शाहू महाराज उड्डाण पुलाखाली मोकळी जागा असून ही जागा पूर्णपणे पडीक आहे. या जागेचा अर्बन स्ट्रीट डिझाईनअंतर्गंत विकास करून तेथे उद्यान सुरू करावे. त्या उद्यानअंतर्गत जॉगिंग ट्रक, बसण्यासाठी लॉन, बेंचेस, रंगीबेरंगी फुलांची रांगोळी, उड्डाण पुलाच्या पीलर्सच्या बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई, ज्येष्ठ नागरिकाना बसण्यासाठी कट्टा, खुली व्यायामशाळा, तसेच विविध खेळांच्या सोई सुविधा कराव्यात.

या सुविधा तेथे उपलब्ध करुन दिल्यास या परिसरातील नागरिकांसाठी हे उद्यान नवा मानदंड ठरेल. शहराच्या विकासाला नवी झालर प्राप्त करून देण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच वापरात नसलेल्या जागेचा पर्याप्त व लोकोपयोगासाठी वापर व्हावा. या भावनेतुन या संकल्पनेची सुरुवात प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षि शाहू महाराज उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत करावी, असे अनुराधा गोरखे यांनी या निवेदनाव्दारे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button