breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना लसीच्या आशेवर राहू नका – WHO

नवी दिल्ली | कोरोनाव्हायरविरोधात लस आणि औषधासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जुटलेत. ही लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र कोरोनाव्हायरसच्या लस येईलच याची अपेक्षा ठेवू नका,कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल, असं म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सावध केलं आहे.

कोविड-19 साठी जागतिक आरोग्य संघटनेचे दूत आणि लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक डेव्हिड नॅबारो यांनी असा इशारा दिला आहे. एका इंग्रजी वृतसंस्थेने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

डेव्हिड नॅबारो म्हणाले, “कोरोनाविरोधात यशस्वी लस तयार होईलच असं नाही, त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या दहशतीतच जगावं लागेल. प्रत्येक व्हायरसविरोधात एक सुरक्षित आणि प्रभावी अशी लस तयार करू शकत नाही. काही व्हायरस असे असतात, ज्यांच्याविरोधात लस तयार करणं कठिण असतं. त्यामुळे कोरोनाव्हायरसविरोधात लस निश्चित आणि लवकर बनेल या आशेवर राहू नका. व्हायरसच्या धोक्यात आपलं आयुष्य जगण्याचा नवा मार्ग शोधावा लागेल. नव्या परिस्थितीशी माणसांना जुळवून घ्यावं लागेल”

“याचा अर्थ कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करावं लागेल. वयस्कर व्यक्तीचं संरक्षण करावं लागेल. शिवाय कोरोनाव्हायरसवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची क्षमताही वाढवावी लागेल. आपणा सर्वांसाठी हे एक न्यू नॉर्मल असेल”, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button