breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या 14 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राजभवनात एकूण 100 कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 14 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 60 कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वरीष्ठ अधिकारी तर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राजभवनात एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर 14 जणांना लागण झाल्याचे समोर आले. लागण झालेले सर्व कर्मचारी राजभवनातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहतात.

दोन दिवसांपूर्वी 100 जणांची चाचणी झाली होती. त्यात 40 जणांचे अहवाल आले आहेत. त्यापैकी 14 जणांना लागण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, राज्यातही सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button