breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

राजजी किंवा राजुजी दोघांपैकी कोणी महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल झाले असते पण…: विश्वंभर चौधरी

पुणे | प्रतिनिधी

मनसे आणि स्वाभिमानी हे पक्ष (स्वतंत्रपणे) तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रात निश्चित उभे राहिले असते. राजजी आणि राजूजी यांपैकी कोणी ना कोणी महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होऊ शकले असते मात्र कधी या तर कधी त्या मुख्य पक्षांच्या आणि नेत्यांच्या प्रेमात पडणं आडवं आलं, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

चौधरी म्हणतात की, राज यांनी एकेकाळी मोदींची खूप आणि जाहीर स्तुती केली. नंतर ते पवारांच्या इतके जवळ गेले की जवळपास एकरूपच झाले. आता ते दोन्हीकडे नाहीत (म्हणजे नसावेत). काॅग्रेस आणि राष्ट्रवादीकडे हुकमी वक्ता नाही तितकीच त्यांना राज यांची उपयुक्तता होती.

तीच गत स्वाभिमानीची झाली. एनडीए आणि युपीए पेक्षा वेगळा पर्याय म्हणून आता त्यांच्या कडे पाहिले जाऊ शकत नाही.

अरविंद केजरीवाल यांनी एनडीए आणि युपीए यांच्या कधीही नादी न लागता छोटं पण आत्मसन्मानाचं वेगळं राजकारण केलं. त्याचा त्यांना फायदाच झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button