breaking-newsपिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलींचा हत्याकांड आणि बलात्कार घटनेचा पिंपरीत निषेध

पिंपरी – पिंपरीतील अल्पवयीन मुलीचे हत्याकांड व कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समितीच्या वतीने कॅंडल मार्च करण्यात आले तसेच वाईट कृत्य करणा-यांना पकडून त्वरीत फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरीतील रमाबाई आंबेडकर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा निर्घृण पणे खून करण्यात आला असून एच.ए. मैदानातील झुडपात तिचा मृतदेह काल पोलिसांना मिळाला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. मागील दहा दिवसांपूर्वी कासारसाई हिंजवडी या ठिकाणी उस तोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केला त्यातील एकीचा मृत्यू झाला आहे.

ज्या ठिकाणी महिला, मुली यांचा अधिकचा वावर आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, भविष्यात अशा प्रकारची हृदयद्रावक घटना घडू नये, याकरिता झोपडपट्टी व इतर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, आरोपीस तात्काळ अटक करावी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील नियुक्त करुन हा खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांता सोनकांबळे, भीमराव तुरुकमारे, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, राजू सावंत, अजिजभाई शेख, विजय फडतरे, अजय लोंढे, किरण तुरुकमारे, विशाल गायकवाड, किरण फडतरे, युवराज पवार आदींनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button