breaking-newsआंतरराष्टीय

रशियाकडून शस्त्र खरेदीवरील निर्बंधांमधून भारत वगळलेला नाही

  • पेंटॅगॉनकडून स्पष्ट संकेत

वॉशिंग्टन – रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याबाबत अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमधून भारताला आपोआप सूट मिळाली नसल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले आहे. भारताने रशियाकडून 5 अब्ज डॉलर किंमतीची क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या या संरक्षण व्यवहाराबाबत अमेरिकेला चिंता असल्याचेही पेंटॅगॉनने म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांच्या धोरणांच्या विरोधी कायद्यानुसार भारतासारख्या देशांना सूट मिळणे अपेक्षित आहे.

भारत रशियाकडून 4.5 अब्ज डॉलर किंमतीची एस-400 ट्रिम्फ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याबाबत नियोजन करत आहे. मात्र रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याबाबत अमेरिकेने व्यापारी निर्बंध जारी केले आहेत. भारताला या निर्बंधांमधून सूट देण्यास अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटिस यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे. आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठीचे संरक्षण उपमंत्री रॅन्डल जी. स्चीव्हर यांनीही भारताला सूट मिळू शकेल, असे निश्‍चितपणे सांगता येऊ शकणार नाही. त्यासाठी दोन्ही सरकारांमधील उच्चस्तरिय चर्चा होणे गरजेचे आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

भारत आणि रशियातील ऐतिहासिक संबंधांची आम्हाला जाणीव आहे. मात्र भारताने परंपरेला अनुसरू नये तर भविष्याचा विचार करावा यासाठी भारताशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामुळे भारताला सूट मिळण्याची हमी देता येऊ शकत नाही, असे स्चीव्हर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button