breaking-newsराष्ट्रिय

चंद्रपुरात गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी

  • शेजारी राहणाऱ्या दोन तांत्रिकांना अटक

चंद्रपूर – चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील खंडाळा इथून बेपत्ता झालेल्या दोन वर्षीय युग मेश्रामची गुप्तधनाच्या लालसेतून हत्या झाल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घराशेजारील तांत्रिकाने युगचा बळी दिला. या प्रकरणी सुनील आणि प्रमोद बनकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

केसात तीन भोवरे असलेल्या युग मेश्राम 22 ऑगस्ट रोजी घराशेजारी खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. युग मेश्रामच्या घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात काल (29 ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत होती. मात्र काल पोलिसांना घराशेजारीच त्याचा मृतदेह आढळला.

या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर युग मेश्रामाचा नरबळीच असल्याचे सुनील आणि प्रमोद बनकरच्या चौकशीतून समोर आले. घरासमोर खेळणाऱ्या युगला चॉकलेटचे आमिष दाखवून हे आरोपी त्याला घेऊन गेले. त्यानंतर युगची पूजा करुन त्याची हत्या करण्यात आली. गुप्तधनाच्या लालसेपोटी युगचा बळी दिला असल्याचे आरोपिंनी सांगितले.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातही गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी देण्याचा प्रयत्न अंनिसने उघडकीस आणला होता. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वीही जोदूटोणा, भानामती, मजली अशा प्रकारात अनेकांचे बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button