breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रविवारी निघणार राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सुरक्षा संदेश रॅली

 

  • महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांची माहिती
  • अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम      

 

पिंपरी – मागील वर्षात शहरात महिलांवरिल अत्याचारात वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात तरूणींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. याकडे शासनाचे व पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. २२) शहरातून ‘महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडीट संदेश देणारी दुचाकी, चारचाकी रॅली’ काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी गुरूवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, शहर प्रवक्ते फजल शेख, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, उपाध्यक्षा डिगा माधवन आदी उपस्थित होते.

 

काळभोर म्हणाल्या की, 22 जुलै रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता भोसरीतील शिवसृष्टीपासून रॅली सुरू होईल. पुढे संत तुकाराम नगर – भक्ती-शक्ती चौक – बास्केट ब्रिज – जगताप डेअरी – नाशिक फाटा येथून परत भोसरीतील शिवसृष्टी चौकात रॅलीचा समारोप होईल.

 

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले कार्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अजित पवार यांच्या वाढदिसानिमित्ताने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये दि. १२ ते १८ जुलै दरम्यान पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघात पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेत अंतिम फेरित निशा परमार यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विजेत्यांना महिला काँग्रेस शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या उपस्थितीत व माजी महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. परिक्षक म्हणून प्रसिध्द शेफ प्रदिप यांनी काम पाहिले. गुरूवारी चिंचवड मोहननगर येथील राजमाता जिजाऊ विरंगुळा केंद्रात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात महिलांची कर्करोग तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ सातशे महिलांनी घेतला. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button