breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गुजरातवरुन येणारी दुधाची ट्रेन रद्द

  • खासदार राजू शेट्टी डहाणू येथे तळ ठोकून 
    पालघर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या दूध दर आंदोलनाचा धसका गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कारण आज गुजरातमधून येणारी दुधाची ट्रेन रद्द करण्यात आली. गुजरातमधून महाराष्ट्राला होणारी दुधाची रसद रोखण्यासाठी राजू शेट्टी कालपासून डहाणू येथे तळ ठोकून होते. मात्र आज गुजरातमधून दुधाचे टॅंकर आलेच नाहीत.

दूध उत्पादकाला 5 रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. मुंबईत जरी जास्त परिणाम जाणवत नसला तरी राज्यभर आंदोलन हिंसक होताना दिसत आहे. आता या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आक्रमक झालेत.
उद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. तसेच मुलं-बाळं, महिलांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसणार, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button