breaking-newsपिंपरी / चिंचवड

दापोडी दुर्घटनेतील नागेश जमादार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा – सुलभा उबाळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दापोडी दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या नागेश जमादारच्या कुटुंबाला आर्थिक मदत व पालिकामध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना संघटीका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

दापोडी येथे झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत अमृत जलवाहिनी योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मजुराचा पालिकेच्या व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमुरुन दुर्देवी अंत  झाला. नागेश जमादार असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. नागेश हा घरातील एकटा कमवता व्यक्ती होता. त्याच्या मागे चार बहिणी व आई-वडील असा मोठा परिवार असून त्यांच्या उधर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागेशच्या परिवाराला आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्याला पालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी उपजिल्हासंघिटका स्वरूपा खापेकर, नगरसेवक राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, शिल्पा अनपन, संगीता आल्हाट,  विकास गायकवाड, सिद्धार्थ पगारे, लक्षमन शिवशरण, प्रताप शीरशेट्टी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button