breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

“पोलिसांना सांग, मी दोघींना ठार मारलंय” पत्नी-आईच्या हत्येनंतर अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांचा मुलाला फोन

वॉशिंग्टन | आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे कांस्यपदक विजेते माजी अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्यांनी पत्नी आणि आईची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे. “मी तुमच्या आई आणि आजीला ठार मारले. पोलिसांना बोलावून मला घेऊन जायला सांग” असे त्यांनी हल्ल्यानंतर मुलाला फोनवर सांगितले होते.

पेनसिल्व्हेनियामधील डेलावर काउंटी भागात राहणाऱ्या 62 वर्षीय इक्बाल सिंह यांनी रविवारी सकाळी पोलिसांना बोलावून आपला गुन्हा कबूल केला, असे ‘फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ वृत्तपत्राने सांगितले.

पोलिस जेव्हा न्यूटाऊन टाऊनशिपमध्ये असलेल्या सिंह यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते रक्ताने माखलेले आढळले. त्यांनी स्वत:ला भोसकल्याने जखमा झाल्याचे बोलले जाते. तर आत दोघी जणींचे मृतदेह होते, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. कोर्टात सोमवारी सिंह यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. गुन्ह्याचे स्वरुप पाहता कोर्टाने त्यांना जामीन नाकारुन पोलीस कोठडी सुनावली.

रॉकवुड रोडवरील घराच्या पहिल्या मजल्यावर पोलिसांना सिंह यांच्या आई नसीब कौर सापडल्या. त्यांचा गळा चिरण्यात आला होता. तर सिंह यांची पत्नी जसपाल कौरही वरच्या मजल्यावर आढळली होती. सासू-सुनेला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले, मात्र हत्येचा हेतू अस्पष्ट आहे.

“मी त्या दोघींना ठार मारले आहे. मी तुमच्या आई आणि आजीला ठार मारले. पोलिसांना बोलावून मला घेऊन जायला सांग” असे त्यांनी हल्ल्यानंतर मुलाला फोनवर सांगितले. त्याच वेळी त्यांनी मुलासोबत असलेल्या आपल्या मुलीलाही हेच सांगितले.

शॉट पुटर इक्बाल सिंह यांनी कुवेत येथे झालेल्या 1983 च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अमेरिकेत जाण्यापूर्वी ही त्यांच्या क्रीडा कारकीर्दीतील सर्वात मोठी कामगिरी राहिली. ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button