breaking-newsपुणे

पंढरपूरचे कल्याण काळे यांचा भाजपात प्रवेश

पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाडी कुरोली (ता. पंढरपूर) येथील सभेत काळे यांनी प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, सुधाकरपंत परिचारक, रणजित नाईक निंबाळकर, शहाजी बापू पाटील, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, धनाजी साठे, शिवाजीराव सावंत, विजय चौगुले आदी नेते उपस्थित होते.

कल्याण काळे यांच्या भाजप प्रवेशामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. तसेच माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना फायदा होणार आहे.

कल्याण काळे यांचे दोन साखर कारखाने आहेत. युतीच्या काळातच त्यांनी पहिला साखर कारखाना उभारला होता. कल्याण काळे यांचे वडिल वसंतराव काळे हे पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. आता कल्याण काळे पुन्हा काँग्रेसमधून भाजपात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button