breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

रकुलप्रीतने केली दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; ड्रग्ज केस संदर्भातील तिची कोणतीही बातमी मीडियाने दाखवू नये असा आदेश देण्याची विनंती

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंगने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. यात मीडियाने तिच्या ड्रग्ज केस संदर्भातील कोणतीही बातमी लिहू अथवा दाखवू नये असा आदेश देण्याची विनंती केली आहे. तिने अमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी माध्यमांनी न चालवण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. यापूर्वीही रकुलप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे सांगितलं होतं.

रकुलप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना स्पष्ट केलं की, मीडियाने तिच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी किंवा लेख प्रसिद्ध करू नये किंवा वृत्तवाहिनीवर दाखवू नये याची ताकीद न्यायालयाने द्यावी.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी रकुलप्रीत सिंगची चौकशी करण्यात आली. अभिनेत्रीने रियासोबत ड्रग्ज चॅट केल्याचं मान्य केलं. पण यासोबतच तिने अमली पदार्थाचं सेवन न केल्याचंही म्हटलं. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता एनसीबीच्या अतिथीगृहात पोहोचलेल्या रकुलप्रीतची ब्युरोच्या एसआयटी टीमने सुमारे चार तास चौकशी केली होती.

रकुलप्रीतचं नाव रिया चक्रवर्तीच्या जबाबात समोर आलं होतं. रकुलनेही आजच्या चौकशीत ड्रग्ज चॅटचं संपूर्ण खापर रियावर फोडलं. रियाचं अमली पदार्थांचं सेवन करायची आणि चॅटमध्येही मी याचाच उल्लेख केला असल्याचं रकुल म्हणाली. रियाचं जे सामान माझ्या घरी होतं तेच मी तिला घेऊन जायला चॅटमध्ये सांगत होते, असं स्पष्टीकरण रकुलने यावेळी दिलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button