breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार

सांगली: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असं असताना देशातून तसेच राज्यातून अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. सांगलीमध्ये आज पहाटेच्या सुमारास क्वारंटाइन सेंटरमधील दोन कोरोनाबाधित कैदी फरार झालेले आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पोलीस या कैद्यांचा शोध घेत आहेत.

राज्यात यापूर्वीदेखील कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात दोन कैद्यांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर या आरोपींना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. मात्र, या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, आज पहाटेच्या सुमारास या दोन कैद्यांनी सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील काचा फोडून तसेच गज तोडून पळ काढलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button