Uncategorizedपश्चिम महाराष्ट्र

योगेश कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पलूस येथे झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. यावेळी सांगली जिल्ह्याचे नूतन प्रभारी प्रदेश सचिव गणेश वरपे, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री खाडे, युवा मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील, संघटन सरचिटणीस सुंदर पाटील, शिराळा नगरसेवक केदार नलावडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर नाईक, युवा मोर्चा नूतन जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, रुपेश चव्हाण, विनोद पन्हाळकर, धनाजी आबा उपस्थित होते.

भाजप नेते सत्यजित देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील यांचे कुलकर्णी अगदी जवळचे सहकारी मानले जातात. सत्यजित देशमुख आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी योगेश कुलकर्णी यांना काम करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच संघटनेच्या विविध पदावर काम करण्याची संधी दिली. त्यावेळेस त्यांनी समाजोपयोगी काम करून दाखवले. त्यांच्या याच कामासाठी वरिष्ठांकडून कुलकर्णी यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button