breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

बीकेसीच्या सभेत मुख्यमंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख, अजित पवार म्हणाले…

सांगली: भोंगे, हनुमान चालिसा हे राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काही लोक माथी भडकावून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, सकाळी ८ म्हणजे पहाटे ५ नव्हे, पण तुमची पहाट असेल तर धन्यचं, अशा शब्दात भाजपासोबतच्या शपथविधीच्या वेळेवरून विरोधकांना टोला लगावला आहे. अजित पवार हे सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘कोरोनामुळे सरकारची आर्थिक घडी बिघडली आहे. पण, राज्य सरकार काम करत आहे. सांगली महापालिका क्षेत्रात अंडर ग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी प्राधान्य देणार, राज्यातील सर्व महापालिकेने देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे गरजेचे आहे. सांगली पहापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर करत असून २५ कोटी तातडीने देणार, दिलेला निधीचा महापालिकेने योग्य ऊपयोग करावा. तसेच, आज शहरातील कचऱ्याची व्हिलेवाट लावण्यासाठी महापालिका, नगरपालिकेने प्राधान्य देणे गरजेचे आहे. कचऱ्यावर अनेक ठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या सदस्यांना अपात्र करण्याच्या बाबतीत कायदा किंवा बंधने घातली पाहिजेत या दृष्टीने आपला विचार आहेट, असं अजित पवार म्हणाले.

‘यंदा महाराष्ट्र अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, ऊस लवकर संपेल याचे नियोजन केलं आहे. तसेच, रिकव्हरी खूप लॉस झाली आहे. २०० रुपये टनचं नुकसान झाले आहे. तर सोयाबीन आणि कापूसासाठी निधी दिलेला आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

  • जे काय सध्या महाराष्ट्र चाललंय ते पटत नाही – अजित पवार

‘जे काय सध्या महाराष्ट्र चाललंय ते पटत नाही. आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहे तो महागाईचा. पण, काही लोक माथी भडकवायचं काम करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्रीसुद्धा आजपर्यंत शांत होते. पण, काही लोक राजकीय स्वार्थासाठी भोंगे, हनुमान चालिसा असे धार्मिक मुद्दे करत आहेत. काही व्यक्ती विकृतपणे बोलत असतील, तर विनाश काले विपरीत बुद्धी असे एका वाक्यत म्हणावे लागेल. संविधानाने आपल्याला अधिकारी दिला आहे, म्हणून काहीही बोलावं हे योग्य नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण खराब होणार असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शरद पवारांचे ६० वर्षाची कारकीर्द आहे. पण, त्यांनी कधी कमरेच्या खालची टीका, आरोप कोणावर केला नाही’, असंही अजित पवार म्हणाले.

  • सकाळी आठ वाजता म्हणजे त्यांच्यासाठी पहाट असेल तर ते धन्यच – अजित पवार

‘मुख्यमंत्री बोलले नसते तर चुकीचा अर्थ काढला असता. त्यामुळे ते १४ तारखेला बोलणार होते. त्यांनी भूमिका मांडली. पण, मला मुख्यमंत्री काय बोलले यात अजिबात इंटरेस्ट नाही. आपण विकासाचं बोलू, तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमधून पहाटेच्या शपथविधीचा केलेल्या उल्लेखावरून बोलताना आपण त्या वेळीच काही गोष्टी बोललो आहोत आणि ज्या वेळी आपल्याला वाटेल त्यावेळी त्या सर्व गोष्टी बोलू आता ती वेळ नाही. पण, काही लोक पहाटे पहाटे असं सारखं सांगतात. सकाळी आठ वाजता म्हणजे त्यांच्यासाठी पहाट असेल तर ते धन्यच’, अशा शब्दात अजित पवारांनी फटकारलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button