breaking-newsराष्ट्रिय

योगदिनी पंतप्रधान डेहराडूनमधील कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने डेहरादूनमध्ये आज होणाऱ्या समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. डेहरादूनमधील वन संशोधन संस्थेच्या हिरवळीवर हजारो स्वयंसेवकांसह पंतप्रधान योगासने करणार आहेत. यानिमित्त जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त जगभरातील योगप्रेमींना शुभेच्छा देतांना पंतप्रधान म्हणाले की, योग ही प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी मानव जातीला दिलेली ही अमुल्य भेट आहे. योगाभ्यास हा केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम नाही, तर आरोग्याची हमी देणारे पारपत्र आहे, तंदुरुस्ती आणि मन:शांतीची गुरुकिल्ली आहे. तुम्ही सकाळी जे व्यायाम करता, तेवढ्या पुरता योगा मर्यादित नाही. तुमची दैनंदिन कामे मेहनतीने आणि संपूर्ण सजगतेने करणे हा देखिल योगाभ्यासाचा एक प्रकार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आजच्या अतिरेकाच्या जगात योगाभ्यासामुळे संयम आणि संतुलन शक्‍य होते. मानसिक दबाव असलेल्या या जगात योगामुळे शांती मिळते. दुर्लक्षित जगात योगाभ्यासामुळे लक्ष केंद्रीत करायला मदत मिळते. भयमुक्त जगात योगाभ्यासामुळे आशा, सामर्थ्य आणि धैर्य प्राप्त होते, असे पंतप्रधान म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर विविध योगासनांची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच जगभरात विविध ठिकाणी योगासने करणाऱ्या लोकांची छायाचित्रेही पंतप्रधानांनी सोशल मिडियावर दिली आहेत. यापूर्वी 2015 मध्ये नवी दिल्लीतील राजपथावर, 2016 मध्ये चंदीगडमधील कॅपिटॉल कॉम्लेक्‍स येथे, तर 2017 मध्ये लखनौमधील रमाबाई आंबेडकर सभास्थळ येथे पंतप्रधान योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

योगाभ्यासाच्या विकासासाठी अमुल्य योगदान दिलेल्यांना पंतप्रधान पुरस्कार जाहीर 
नाशिकचे विश्वास मंडलिक आणि मुंबईची “द योगा इन्स्टिट्यूट’ या संस्थेला योगाभ्यासाला प्रोत्साहन आणि विकासात अमुल्य योगदान दिल्याबद्दल 2018च्या पंतप्रधान पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. विविध गटांमध्ये मिळालेल्या 186 अर्जांमधून ही निवड करण्यात आली आहे. 21 जून 2016 रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. आयुष मंत्रालयाने या पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्व विकसित केली होती. स्मृति चिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button