breaking-newsराष्ट्रिय

येस बँकेवर निर्बंध; भाजप हा ‘पाकीटमारांचा’ पक्ष – खासदार संजय सिंह

भाजपचा हिंदू-मुस्लिम व्हायरस हा करोना पेक्षाही अधिक खतरनाक

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय सिंह यांनी येस बँकेच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केलंय. संजय सिंह यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत भाजप हा ‘पाकीटमारांचा’ पक्ष आहे, अशी टीका त्यांनी केली. ईशान्य दिल्लीतील दंगलीवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

ना हिंदू वाचणार ना मुस्लिम. भाजपच्या राज्यात प्रत्येक जण लुटला जणार. भाजपचा हिंदू-मुस्लिम व्हायसर हा करोना व्हायरस पेक्षाही अधिक खतरनाक आहे. एकीकडे तुम्हाला दंगलीत गुंतवले तर दुसरीकडे भारतीय जेबकतरा पार्टीने (BJP)तुमचे पाकीट मारले, असं संजय सिंह म्हणाले.

भाजपने आता नवीन फॉर्म्युला आणला आहे. हिंदूंनाही लुटणार आणि मुस्लिमांनाही. दंगलीत अडकवून सर्वांना लुटणार. हिंदू-हिंदूचा राग आळवणाऱ्या भाजपवाल्याने येस बँकेचे किती पैसे लुटले, किती हिंदूंना लुटले आणि किती मुस्लिमांना, हे ही सांगा, असा सवाल संजय सिंह यांनी केला.

भाजप जे करतं ते मोठंच करतं. तुम्ही सावध व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त ४ बँका बुडाल्या आहेत. हा बँक बुडण्याचा सिलसिला सुरूच राहणार आहे. जोपर्यंत धनाढ्यांकडील तुमची पै अन् पै वसूल होत नाही. तोपर्यंत त्यांना विदेशी पळून जाण्यापासून रोखले पाहिजे, असं संजय सिंह म्हणाले.

हिंदू-मुस्लिमच्या राजकारणात पडू नका. या राजकारणाने तुमचे नुकसानच होणार. एकजूट व्हा. महागाई वाढतेय. बेरोजगारी वाढतेय. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण तुम्ही यावर कुठलाही प्रश्न विचारत नाहीए. महिला अजूनही सुरक्षित नाहीए. देशातील वाहन उद्योग संकटात आहे. पण कोणची प्रश्न विचारत नाहीए. मोठ मोठ्या सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. रेल्वेपासून SAIL, BPCL, LIV पासून सर्व कंपन्या विकायला काढल्या आहेत. तरीही तुम्हाला प्रश्न पडत नाहीए. कारण, तुम्ही हिंदू-मुस्लिमच्या भोवऱ्यात अडकला आहात आणि भाजप हिंदूंच्याही पैशावर डल्ला मारत आहे, असा गंभीर आरोप संजय सिंह यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button