breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास ग्रामस्थांच्या वतीने सन्मानपूर्वक जलाभिषेक

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी प्रभाग क्र.२१ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानुषगाने श्री. सिद्धार्थ संजय कंक (सरसेनापती येसाजीराव कंक यांचे वंशज) यांच्या हस्ते बुधवारी सन्मानपूर्वक जलाभिषेक करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरणाचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. सदर ठिकाणी असलेला पूर्वीचा पुतळा बदलून नवीन सिहासनास्थ पुतळा (रायगड प्रतिकृती) बसविण्यात येणार आहे.

तत्पूर्वी शिवस्मारक समिती व अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव व पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मानपूर्वक जलाभिषेक कार्यक्रम सरसेनापती येसाजीराव कंक यांचे १४ वे वंशज श्री. सिद्धार्थ संजय कंक यांच्या शुभहस्ते व रायगड येथील राजपुरोहित प्रकाश स्वामी यांचे उपस्थितीत करण्यात आला.

सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर सौ. उषा (माई) ढोरे, उपमहापौर श्री. तुषार हिंगे, नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे, नगरसेवक डब्बु आसवणी, वस्ताद दत्तोबा नाणेकर, किसनराव कापसे, संतसेवक बाळासाहेब वाघेरे, कुणाल साठे, चंद्रकांत गव्हाणे, उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button