breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’चा गणपती: उपमहापाैर तुषार हिंगे यांचा संकल्प; म्हणाले भविष्यात ‘हीच’ संकल्पना शहरात राबविणार!

‘महाईन्यूज’ पुणे विभागीय कार्यालयातील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे काैतूक

पिंपरी| प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सध्यस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात प्रभागनिहाय विर्सजनास हाैद तयार करणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपआपल्या घराशेजारीच ‘श्री’चे विर्सजन करता येईल. यामुळे नदी पात्रातील निर्माल्य आणि मूर्ती विर्सजनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यास निश्चित मदत होईल, तसेच ‘महाईन्यूज’ आर्दश घेवून भविष्यात तुरटीच्या ‘श्री गणेश मूर्ती’ भेट देण्याची संकल्पना राबविण्यात येईल, असे उपमहापाैर तुषार हिंगे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ”महाईन्यूज”ने घेतला. त्यानुसार तुरटीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यालयात बसविली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला जात आहे. आज आरती करण्याचा मान उपमहापाैर तुषार हिंगे यांना देण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘महाईन्यूज’चे अधिक दिवे-पाटील, अमोल शित्रे, विकास शिंदे आदी सहकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात अल्पावधित सडेतोड, निष्पक्ष, विश्वासार्हच्या जोरावर ”महाईन्यूज”ने यशस्वी भरारी घेतली आहे. आॅनलाईन सोशल मीडियाचे चाललेले कामकाजही त्यांनी जाणून घेतले. संपादक, पत्रकार, निवेदिका, डिजिटल मॅनेजर, कॅमेरामन, ग्राफीक डिझायनर यांच्यावरील जबाबदारी त्यांना सांगण्यात आली. वेब न्यूज पोर्टल (www.mahaenews.com), फेसबुक पेज (Mahaenews), यू ट्यूब (mahaenews.com) याची माहिती त्यांनी घेतली. अल्पावधीत वाचकांच्या मनात स्थान निर्माण केल्याने हिंगे यांनी संपूर्ण स्टाफचे कौतुक केले.

महाईन्यूज कार्यालयातील ‘श्री” ची आरती करताना उपमहापाैर तुषार हिंगे

उपमहापाैर हिंगे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग पिंपरी चिंचवड शहरात वाढतच चालला आहे. या परस्थितीत मानवाने जगायचे कसे? हे आपण शिकले पाहिजे. गणेशोत्सव काळात नदीच्या घाटावरील निर्माल्य आणि श्री गणेश विर्सजनात पर्यावरणाची हानी होणार नाही. यांची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. लाॅकडाऊन काळात नद्याच्या प्रदुषणात घट झालेली असून पुढे नदी प्रदुषण कसे रोखता येईल. याबाबत नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव साजरा करताना यापुढे साधेपणा जपायला हवा. तसेच रस्त्यावरील मंडपामुळे वाहतूकीला होणारा अडथळा, हाॅस्पीटल, शाळा परिसरात कर्कश आवाजाने होणारे ध्वनी प्रदुषण, तसेच नदी पात्रात निर्माण होणारे निर्माल्य, मुर्तीचे विर्सजनाने नदी प्रदुषण कसे कमी करता येईल, यावर भविष्यात आपणाला गांर्भियाने विचार करावा लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापाैर तुषार हिंगे यांच्याशी शहरातील विविध विषयावर चर्चा करताना महाईन्यूजचे अधिक दिवे-पाटील, अमोल शिंत्रे व विकास शिंदे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button