पिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

युवाशक्तीच्या पाठींब्यामुळे आमदार चाबुकस्वारांचा विजय निश्चित – प्रतीक्षा घुले

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
युवासेना पिंपरी विधानसभातर्फे आज प्रभाग निहाय मिटिंगा आयोजन केल्या. बोपखेल, कासारवाडी, फुगेवाडी, मोहननगरला मीटिंगा पार पडल्या. महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांचे तरुण वर्गामध्ये जास्त आकर्षण आहे. महायुतीचे उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार ह्यांच्या कार्याचा लेखाजोखा तळगाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी युवतीअधिकारी प्रतीक्षा घुले, नगरसेविका मीनल यादव, रवींद्र कोवे, किरण रोकडे, एकनाथ हाके, प्रमोद शिंदे, चंद्रकांत शिंदे, विकास गायकवाड, रवी नगरकर, सनी कड, अजय कुमार, सोन्या लांडे, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, अनुजा घुले, सचिन कोष्टी उपस्थित होते. मिटिंगचे नियोजन विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button