breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सीजनयुक्त बेड्स आणि व्हेंटिलेटर्स वाढवावेत – मारुती भापकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोग्यविषयक सुविधा व वैद्यकीय सुविधा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून काल 22 जुलै रोजी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील 10 कोविड रुग्ण, ऑक्सीजन यंत्रणांमधील तांत्रिक त्रुटीमुळे मृत्यू पावले. याप्रकरणी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा घेतलेला पवित्रा तात्पुरता मागे घेऊन माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

या संदर्भात महानगरपालिकेने सर्व यंत्रणा अद्यावत कराव्यात. शहरांमध्ये ऑक्सीजन युक्त बेड्सची संख्या वाढवावी. व्हेंटिलेटर्स अधिक प्रमाणात उपलब्ध करावेत. उपचार व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी. या मागण्यांसाठी तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवहाराची चौकशी करून तो दोषी असेल तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केल्या. या शिष्टमंडळातमध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, युवक अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव गिरीश वाघमारे, कष्टकरी पंचायतचे बाबा कांबळे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, नकुल भोइर, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध यांचा समावेश होता.

याप्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ऑक्सिजन यंत्रणेमध्ये कुठलाही दोष नव्हता, असा खुलासा केला. त्याचबरोबर आगामी दहा दिवसांमध्ये सातशे नवीन बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. यातील 500 बेड्स हे ऑक्सिजनसह असतील व 200 बेड्स व्हेंटिलेटर असणारे असतील. येणाऱ्या महिन्यामध्ये बालेवाडीमध्ये 1000 बेड्स असणारे सुसज्ज रुग्णालय उभे करण्याची तयारी महापालिका तातडीने करत असल्याबद्दलची माहिती आयुक्तांनी दिली.

हे आंदोलन तात्पुरते स्थगित

सध्या कोविड रुग्णांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. शहरातील रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे आश्वासन आयुक्त यांनी शिष्टमंडळास दिले. आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर व सर्व प्रकारच्या वैद्यकीय त्रुटींवर लवकरच उपाय करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नियोजित आंदोलन काही काळापुरते स्थगीत करण्यात आल्याचे मारुती भापकर आणि मानव कांबळे यांनी जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button