breaking-newsमनोरंजन
ही मॉडेल ठरली जगातील सर्वात सुंदर महिला
त्येक व्यक्तीची शरीर रचना, त्वचेचा रंग ज्या प्रमाणे वेगवेगळा असतो त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीची सौंदर्याची व्याख्यादेखील वेगळी असते. पण तरीही विज्ञानाने सुंदर महिलांची गणती करताना काही निकष बनवले आहे. ग्रीक सौंदर्याच्या मापदंडानुसार २३ वर्षांची सुपरमॉडेल बेला हदिद (Bel’a Hadid) ही जगातील सर्वात सुंदर महिला ठरली आहे.
‘गोल्डन रेशियो ऑफ ब्यूटी फी स्टँडर्स’च्या मापदंडानुसार व्हिकटोरीया सेक्रेट मॉडेल बेला हदिदचा चेहरा सुंदर महिलांच्या मापदंडामध्ये जवळपास फिट बसतो. त्यामुळे ती जगातील सर्वात सुंदर महिला ठरली आहे. ग्रीक गणितपद्धतीनुसार गोल्डन रेशियो ऑफ ब्यूटी फीने सौंदर्याचे काही मापदंड तयार केले आहेत. या मापदंडामध्ये २३ वर्षीय बेलाचा चेहरा ९४.३५ टक्के जुळत असल्याचे म्हटले आहे.